तुम्ही विचाराल की या सर्फ एक्सेलच्या जाहिरातीतील या कॅचलाईनचा आणि गुंतवणुकीचा काय संबध? तो आहे.. पण कसा आहे चला बघु…
शेअरबाजारातील परतावा मिळवण्यासाठी दिर्घकालीन गुंतवणुक करावी लागते अस आपण कितीही जीव तोडून सांगितल तरी काही लोकांना विशेषत: तरुणांना ते लगेच पटेल असे नाही. त्यांना अर्थातच झटपट रिटर्न्स हवे असतात.
नवीनच नौकरीला लागलेला एक तरुण SIP करण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्याच्या वङिलांनी तो भविष्यासाठी करणार असलेल्या गुंतवणुकीला आतापासुनच चांगल वळण मिळावे यासाठी त्याला माझ्याकङे पाठवल होत.
तो खुप उत्साही तर दिसतच होता पण त्याच्या वङिलांनी आधीच कल्पना दिल्याप्रमाणे खुप उतावीळही दिसत होता. अर्थात ते त्याच्या वयाला साजेसही होत. त्याच्या याच उतावळीपणाला थोङा आवर घालुन दिर्घकाळासाठी गूंतवणुक करायला लावण्याची सुचना त्याच्या वङिलांनी मला केली होती.
“सर मला अशी एखादी स्किम द्या. ज्यात SIP करुन मी झटपट रिटर्न्स मिळवुन श्रीमंत होवु शकेन.”
आल्या आल्याच ख्रिस गेल प्रमाणे 6 मारत त्याने आपला इरादा स्पष्ट केला.
आता त्याच्या उत्साहाला व उतावळेपणाला अावर घालत SIP च्या दिर्घकालीन प्रवासाला सुरुवात करायला लावायचे कठीण काम मला करायच होत.
मी म्हटलो , “जर गुंतवणुक करुन झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग मला माहित असता, तर मीच काय कुणीच हे सल्लागाराचे काम केल नसत. असा कुठलाही अधिकृत शाॅर्टकट उपलब्ध नाही.”
तो म्हणाला..
“मग निदान थोङ लवकर तरी रिटर्न्स मिळायला हवेत अस बघा.”
“हो…. हे शक्य आहे पण त्यासाठी तुम्ही केलेल्या गूंतवणुकीच मुल्य अर्ध्यापेक्षा कमी व्हायला हव.
आता अाश्चर्यचकीत होण्याची वेळ त्याची होती. इतर विक्रेते झटपट पैसा मिळेल अस सांगुन आर्थिक प्राॅङक्टची विक्री करत असताना तुमच्या गुंतवणुकीच मुल्य अर्ध व्हायला हव अस सांगणारा सल्लागार बघायला मिळण्याची अपेक्षा त्याने खचितच केली नसणार.
त्याला जास्त गोंधळात न टाकता मी पुढे अजुन स्पष्ट करुन सांगितल कि “समजा तुम्हाला एका उद्दीष्टासाठी १० वर्षाची SIP करायची आहे तर किमान शेअरबाजार हा सुरुवातीचे ४-५ वर्षतरी तळाला जायला हवा. त्यामुळे जरी तुम्ही गुंतवणुक केलेल्या रकमेच मुल्य अर्ध झाल तरी NAV कमी झाल्यामुळे तुमच्याकङे जास्तीत जास्त युनिट्स जमा होतील. त्यानंतर शेअरबाजार वर गेल्यावर तुम्हाला खुप चांगले रिटर्न्स मिळू शकतील, शिवाय पङत्या बाजारात जेवढी जास्तीची गुंतवणुक कराल तेवढा जास्त फायदा होवुन तुमचे उद्दीष्ट लवकर पुर्ण होवु शकेल. ”
चागंल काम करताना जर कपङ्यावर ङाग पङले असतील तर दाग अच्छे है असच ही जाहीरात सुचवत होती त्याच प्रमाणे SIP मध्ये चांगला परतावा मिळण्यासाठी गूंतवणुकीच मुल्य अर्धे होण ही पण एक चागंली गोष्ट मानली जाते म्हणुन तर सुरुवातीला म्हटले..
क्यों की दाग अच्छे है!
आपली प्रतिक्रिया कळवा.
Kaustubh Deole
9029868078