अनेक लोक मला विचारतात कि म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणूक किती केली पाहिजे, कधी वाढवली पाहिजे, कधी कमी किंवा बंद केली पाहिजे ?
पहिले लोक कसे SIP करतात हे समजून घेऊ?
बहुतेकदा लोक म्युच्युअल फंड मध्ये SIP गुंतवणूक सुरुवात करताना एक लहान SIP नि सुरुवात करतात हळू हळू एक 5 वर्षात थोडी थोडी SIP वाढवतात. ज्यांना 10 वर्षांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा अनुभव आहे त्यांचा विश्वास पक्का झालेला असतो आणि आज ते फार अधिक प्रमाणात किंवा आक्रमक SIP करतात.
पण यात काही चूक आहे का ?
हो आहे, एक खुप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चक्रवाढ व्याज (Compound Interest)
खालील उदाहरण पहा !
समजा किरण याने 1000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या 30 वर्षांसाठी चालू ठेवली.
तर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 56,00,000 ( ५६ लाख) इतकी होईल. (गुंतवणूक – 3,60,000)
आता समीर चे उदाहरण पाहू !
समजा समीर याने 2000 रुपयाची SIP सुरु केली व ती पुढच्या फक्त 10 वर्षांसाठी चालू ठेवली, 10 वर्षानंतर ती जमलेली गुंतवणूक रक्कम पुढची 20 वर्ष फक्त तशीच वाढू दिली.
तर 15% परताव्याप्रमाणे त्याची रक्कम 30 वर्षाच्या शेवटी 86,00,000 ( ८६ लाख) इतकी होईल. (गुंतवणूक – 2,40,000)
किरण ने समीर पेक्षा 20 वर्ष जास्त गुंतवणूक केली, 1,20,000 रुपये जास्त गुंतवणूक केले तरी सुद्धा समीरचा परतावा किरण पेक्षा 30,00,000 रुपयांनी जास्त आहे.
असे का झाले?
भाई ये सब जादू “चक्रवाढ व्याज” (Compond Interest) का हे !
चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज, जेव्हा आपण SIP करतो तेव्हा पहिल्या 10 वर्षात केलेली गुंतवणूक सर्वात जास्त चक्रवाढ व्याज कमावते आणि बाकीची 20 वर्षातील SIP हि फार कमी चक्रवाढ व्याज कमावते त्यामुळे हा रिसल्ट येतो.
मग आपण काय केले पाहिजे ?
फक्त SIP केली, खूप वर्षासाठी केली म्हणून आपला रिटर्न वाढणार नाहि तर सुरुवातीच्या काळात आपण किती SIP करतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे!
जर तुमच्याकडे निवृत्त होण्यासाठी 30 वर्षे शिल्लक आहेत तर लक्षात ठेवा, त्यातील पहिली 10 वर्षे इन्वेस्टमेंटच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहेत.
अर्थात खेचून ताणून SIP नक्कीच करू नका पण जमत असेल तर नक्कीच विचार करा!
प्रतिक्रिया नक्की कळवा !
प्लॅनिंग करा आणि निर्धास्त व्हा !
कौस्तुभ देवळे