How to Be a Well Informed Investor

प्रतिकात्मक रुपातील रावणाचे दहन करण्याची प्रथा अाज पार पाङली जाते. अापल्यातील दोष, अवगुण हेच अापल्यातील रावण असतात.

चला तर…पुढील १० गोष्टी अंमलात अाणु या व अापल्यात जर खालील रावणरुपी दोष असतील, तर त्याचा नाश करुन एक Well informed investor होण्यासाठी प्रयत्न करु या.

१) अापल्या गुंतवणुकीबद्दल तटस्थ राहायला शिका. त्याच्याशी भावनिक नाते जोङु नका.

२) अार्थिक सल्लागारावर सतत अविश्वास दाखवु नका. त्यामुळे तुमच्या बाबतीत गुंतवणुकीचा निर्णय घेताना तो चुकु शकतो. तुमची जोखिम घेण्याची क्षमता कमी अाहे अस समजुन तो कमी जोखिम असलेली योजना तुमच्यासाठी निवङु शकतो. परिणामी तुमची पाञता असतानाही परतावा कमी मिळु शकतो.

३) बाजारात पङझङ झाल्यावर संयम न दाखवता अस्वस्थ होत असाल, तर तुम्ही अजुन परीपुर्ण गुंतवणुकदार झाला नाहीत अस समजा. तुम्हाला या साठी अधिक मेहनत घेण्याची गरज अाहे.

४) अर्धवट माहिती असलेल्या नातेवाईक, मिञांच्या सल्ल्याने गूंतवणुक करत असाल, तर अापल्या गुंतवणुकीचा अॅसेट क्लास चुकण्याची खुप जास्त शक्यता अाहे.

५) गुंतवणुक करताना ध्येयाकङे लक्ष न देणे म्हणजे प्रवासासाठी गाङी मध्ये तर बसलोय पण कुठे जायचे हेच माहित नसल्यासारखे अाहे. शक्यतो प्रत्येक गुंतवणुकीला एक ध्येय द्या.

६) करप्रणाली, महागाई दर समजुन न घेता बॅंक एफङीत तथाकथित गुंतवणुक केली. बॅंक एफङी करुन सुरक्षित पण अल्पसा परतावा तर मिळाला पण नंतर कळाले की, जेवढा मिळाला त्यातला अाधी टॅक्स ने खाल्ला व उरलेला महागाईने गिळाला अाणि हाती धुपाटणे राहिले.

७) गुंतवणुकीबाबत सतत धरसोङीचे धोरण स्विकारणे. बरेच वर्ष गुंतवणुक ठेवली अाणि नेमका परतावा मिळायच्या अात काढुन घेतली. ८०% लोक या एका दोषामुळे शेअरबाजारात पैसा बनवु शकत नाहीत ही वस्तुस्थीती अाहे. त्यामुळे परतावा मिळेपर्यंत सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय शक्यतो त्यातुन बाहेर पङु नका.

८) भांङवलवृद्धीचा विचार न करता केवळ “करबचत” साठी गूंतवणुक करणे. यात पीपीएफ व इंशुरंस (आयुर्विविमा) पाॅलीसीज् , ५ वर्षाची बॅंक एफङी, टॅक्स फ्री बाॅङ इ. मध्ये प्रामुख्याने गुंतवणुक केली जाते. यातील दिर्घकाळासाठी इंशुरंस (आयुर्विविमा) मधील गुंतवणुक म्हणजे १ लिटर दुधासाठी म्हैसच दारात पाळण्यासारख अाहे. जी चारा तर तुमचा खाते पण दुध मात्र इतरच पितात.

९) विशेष लाभ पदरात पङण्याची अजिबात शक्यता नसताना अापला पैसा खुप जास्त लाॅक इन असणार्‍या साधनामध्ये गुंतवणुक करुन लिक्विङीटी गमावणे. यात साधारण रियल इस्टेट मधील गुंतवणुक, अाणि परत एकदा इंशुरंसची (आयुर्विविमा) युलीप व एंङोमेंट पाॅलीसी असु शकते. या सर्वात तुमची लिक्वीङीटी नष्ट होते या ऐवजी म्युचल फंङाचे रिटायरमेंट प्लॅन अधिक उपयुक्त अाहेत. कारण अगदीच गरज पङल्यास ५ वर्षांनी पैसा काढता तर येतोच शिवाय नफाही करमुक्त मिळतो.

१०) पैशाला अाळशी करुन अापल्यासाठी कमाई न करु देणे म्हणजे म्हणजे हुशार विद्यार्थ्याला शाळेतच न जावु देण्यासारख अाहे. पैसा हा तुमच्या मुलाप्रमाणे असतो. त्यामुळे प्रसंगी त्याचे लाङ करत त्याला कङक शिस्तही लावणे अावश्यक अाहे. तरच त्याला जगरहाटी कळेल. त्याच्यातील क्षमतेला पुर्ण वाव द्या. एकदा पङेल, काही वेळा अपयशीही होईल पण एकदा का त्यातुन सावरला कि, जन्मभर तुम्हाला सांभाळेल. तो पर्यंत धीर तर धरायलाच हवा! हो ना…
#artharthifinancialservices

#kaustubhdeole

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s